भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Sunday, December 29, 2024

युगंधर चक्रधारी कन्हैया कृष्ण .

कृष्णा, तुझं जमुनेत अंगठा बुडवून, यमुनेला दुभंगून, वासुदेवाची वाट सोपी करणं, स्मरते आतां. उखळासुध्दा चालत जाणारा बाळकृष्ण, दिसतो नजरेसमोर, पेंध्याला खरवस देण्यात झालेला अन्याय दूर करण्यासाठी स्वतः च्या हातानं पेंध्याला खरवस खाऊ घालणारा कन्हैया दिसतो या क्षणाला. पावा वाजवुन गोधन एकत्र करणारा गोपाल दिसतो क्षणाक्षणाला. गोकुळवासियांचे रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलुन त्यांचे इंद्रदेवापासुन रक्षण करणारा गोवर्धनधारी दिसतो. द्वारकेला जाताना राधेला आपल्या नावाच्या अगोदर जोडणारा राधाकृष्ण दिसतो. सुदाम्याचे मित्रप्रेमाचे उदाहरण जगासमोर अमर करणारा कृष्ण सुदाम्या दिसतो. महाभारत घडताना द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा द्रौपदीचाबंधु दिसतो आहे. महाभारताच्या युध्दांत अर्जुनाला गीता समजावुन सांगणारा योगेश्वर दिसतो आहे... मला... अनंत रुपांत दिसणारा हा श्रीकृष्ण.... व्यापुन राहिला आहे मम जीवनाला. 🌹🙏🙏🙏🙏(माझीच जुनी पोस्ट. जन्माष्टमी च्या निमित्ताने) भास्कर)

No comments: