🪟 " भिंती "
माझ्या घराच्या भिंती आहेत, पारदर्शक.. आरपार दिसतं त्यातुन.
माझं मनही असंच आहे, पारदर्शक आहे
आरपार दिसंत त्यातुनही.
एकच अटकळ आहे या साठी,
बघणारांचही मन हवं, तळ दिसणार्या
निर्झरा सारखं, नितळ, शांत, सर्वसमावेशक.
मग आपली दोस्ती पक्की पारदर्शक भिंतीची. 🪟🪟

No comments:
Post a Comment