भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Thursday, June 11, 2026

गणपत पहिलवान

एका पवित्र आत्माची कथा.......... पुर्वी प्रशिध्द केली होती आता पुन्हा नविन मेंबर साठी खाली देत आहे.      
"गणपत पहिलवान "
👥👥👥👥👥👥
अंधारी रात्र होती. पल्ला लांबचा होता. तसे कामे उरकून निघायला उशीर च झाला होता. स्वताची कार असल्याने दिडशे किलोमीटर चे अंतर दोन तासांत पार करणे   सहज शक्य होते. घरी फोन करुन कळविले होते.प्लेअर वर झक्क पैकी कुमार गंधर्वांचे "जमुना किनारे मेरा गांव रे सावरे ऐएयो" हे शास्त्रीय संगीतातील  मीश्र किराणा रागातील बहारदार गित लावले, त्या धुंद करणाऱ्या सुरावटीत व मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना एक आगळाच आनंद होत होता. साधारण अर्ध्या अंतरावर  निमगांव आले. नेहमीच्या हाॅटेल जवळ गाडी उभी केली. मालक बंडोपंत बडी आसामी   माझे चांगलेच मित्र होते. ते शहरांत येत तेंव्हा घरी एक तरी चक्कर मारीत मला  पाहाताच गल्ल्यावरुन बाहेर येत' या या निकम साहेब अलभ्य लाभ. नेहमी प्रमाणे गळाभेट झाली. त्यांनी स्वतः तयार केलेला मस्त पैकी फक्कड चहा प्यायला दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा निघाल्या. अर्धा तास कसा निघून गेला कळलेच नाही. "
उध्या येतो शहरात तुप निघणार आहे  ते घेऊन येतो दोन कामे आहेत तीपण करता येतील" बंडोपंत म्हणाले.दहा वर्षा पासुन अस्सल गावरानी तुप घरपोच करण्याचा शिरस्ता होता. निघतो आता मी बंडोपंताचा निरोप घेतला त्यांनी घड्याळ बघीतले रात्री चा सव्वा वाजला होता. "इतक्या रात्री जाणार का एकटे" त्यांनी टोकले.जातो की नेहमीचा रस्ता आहे दिड तासांत पोहोचले घरी. व हात हलवत अच्छा करून गाडी ला स्टार्टर मारला. मागचे सुंदर अलाप पुर्ण गाणे सुरू झाले. हा रस्ता जास्तच सुनाट होता. रस्त्यावर अंधार होता. सर्वत्र सामसूम होती. अंधारात प्रखर हेडलाईट चे झोत तेवढा तेवढा रस्ता उजळुन टाकत होते. साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर एक अतिशय अरुंद पुल लागला अनेक वेळा या पुलावरून गेलो आलो होतो. हेडलाईट च्या प्रखर प्रकाशात ' पुल संपतो तेथे काही तरी हालचाल दिसली. एक व्यक्ती पांढरा शर्ट व पायजमा घातलेली हात हलवून गाडी थांबवण्यासाठी इशारा करीत होती.मी  समजलो लिफ्ट हवी असेल म्हणून त्याने इशारा केला होता. मी त्वरित गाडी थांबवली. साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षे वयाच्या व धडधाकट शरीर यष्टी असलेल्या त्या व्यक्तीने नमस्कार करून शहरात जायचे आहे नेता का गाडीने म्हणून शांत आवाजांत आर्जव केले. मी मागचे दार उघडले व त्या ला आंत घेतले. आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला.
'फार आभारी आहे साहेब' आतला माणूस धीरगंभीर आवाजांत बोलला. कारचे आंतील दिवे बंद असल्याने ती व्यक्ति मला समोरच्या आरशात दिसत नव्हती. मी काही तरी बोलायचे म्हणून बोललो' पाहुणे कुठले म्हणायचे 'निमगाव चा'उत्तर आले.' काय नांव? 'गणपत पहेलवान' '' अशी प्रश्र उतरं चालु होती. 
अचानक समोरच्या रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रस्ता अडविण्यात आल्याचे 
दिसले.थांबा थांबा साहेब गणपत चा आवाज आला. मागे रिव्हर्स घ्या थोडी गाडी मी थोडी गाडी मागे घेतली. हं आता दाबा एक्सिलेटर. माझ्या उजव्या पायावर प्रचंड दाब आला आहे असे भासले. गणपत शेजारी सिट वर आला बसला आहे असे मला वाटते. एक्सिलेटर वर दाब पडला गाडी झटका देऊन सू करत निघाली. मला कांही ही कळले नाही पण एका मिनिटात जेथे फांद्या पडलेल्या होत्या त्यावरुन वेगाने गाडी पुढे जात होती व अचानक भास झाला गाडी हवेतुन जात आहे. अडथळा मागे गेला आहे हे समजत होते पण एक्सिलेटर वरचा पायाचा दाब कायम होतां आजुबाजुला मानसांचा घोळका आरडाओरडा करत आहे असे वाटले.  गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावत होती. आता पायावर चा दाब कमी झाला आहे. हे जाणवले. गाडी चा वेग कमी केला. काय घडले ते कळलेच नाही. शेजारी तर कोणी नाही. भास असेल मनाची समजूत घालून "काय गणपत राव शहरांत कुठे जायचे आहे." म्हणून विचारले. साहेब नाक्यावर सोडा मी जाईन तेथुन."नाके आले गाडी थांबवली मागचा दरवाजा उघडला. गणपत पहिलवान खाली उतरून माझ्या खिडकी जवळ आले. व हात जोडून म्हणाले फार फार उपकार झाले साहेब. इतक्या रात्री मला आपण गाडी त आणले येतो. हे बोलतांना त्यांचा चेहरा उजाळून निघाला आहे असे मला वाटले. 
घरी पोहचलो.सौ ने दार उघडले. 'चहा ठेवु का विचारले. समोर भिंती वरच्या घड्याळांत बघीतले पावणेतीन वाजले होते. आता झोपलो तर चार तास तरी झोप होईल. चहा नको म्हणून सांगीतले. फ्रेश होऊन अंथरुणावर अंग टाकले. 
        सकाळी विकी' बाबा उठा बाबा उठा करित आला. बाबा बंडोपंत काका आले आहेत. फ्रेश होऊन बैठकीत आलो बंडोपंत त्यांचा मुलगा व ड्रायव्हर आलेले होते.तुप,खरवसाचे दुध, फरसाण, कलाकंद, व भरपूर  ताज्या भाज्या घेऊन बंडोपंत आले होते. बंडोपंत का कुणास ठावूक पण सारखे माझ्या कडे बघत होते. मला काही कळत नव्हते. तेवढ्यात नाष्टा चहा आला. चहा नाष्टा उरकून बंडोपंत.,
 त्यांचा मुलगा ,जीपचा चालक बाहेर जाण्यासाठी निघाले.सौ ने त्यांना दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिलेच. बंडोपंत म्हणाले 'मी येतो वहिनी जेवायला पण या दोघांना खरेदी ची बरीच कामे आहेत ती सगळी उरकण्यात फार वेळ जाईल त्यांना बाहेर च घेऊ देत जेवण. ते तीघेही बाहेर पडले. मी पण स्नान वगैरे करुन कालच्या सर्व कामाचा अहवाल लिहीण्यास बसलो. दुपारी एक वाजता अहवाल पुर्ण करुन वरिष्ठ ना मेलने पाठवीला. व जरा निवांत झालो. कालचा संपूर्ण दिवस व रात्र तसी गडबडीतच गेली होती. अन गणपत पहिलवान नजरे समोर आला. एक सुसंस्कृत व चांगला माणुस होता तो. मनातल्या मनात सर्टिफिकेट देऊन मोकळा झालो होतो मी. पण अडचणी च्या वेळी माझ्या पायांत येवढी ताकद कशी आली. अन रस्ता कोणी अडविला होता. जाऊदे जे असेल ते असो. इतक्यात बंडोपंत आले. जेवणे करून आम्ही दोघे घरातील आॅफिस मध्ये येऊन बसलो. सकाळपासून बंडोपंत काही तरी ऐकण्यासाठी सांगणासाठी उत्सुक होते असा माझा अंदाज खरा ठरला. त्यांनी पहिला प्रश्र केला "रात्री काय घडले"?
असं का विचारताय म्हंटल्यावर ते म्हणाले "पहाटे आम्ही येत असतांना रस्त्यावर झाडांच्या फांद्या तोडून रस्ता आडविला गेला होता असे दिसले. या रस्त्यावर असे प्रकार अधुन मधुन होत असतात. पण पोलीसांनी येऊन रस्ता मोकळा केला होता. नाक्याजवळ पोलीस व्हॅन उभी होती ओळखीच्या इन्स्पेक्टर ने सांगितले. त्यांना कुणी तरी फोन करून सांगितले होते म्हणे. निकम साहेब तुम्ही भर रात्री त्या रस्त्यावरून आलांत म्हणून सकाळपासून चैन पडली नाही. तुम्हाला बघुन बरे वाटले. "
मला रात्रीचा प्रवास व प्रसंग डोळ्यासमोर आला. मी उठुन प्रथम दाराला कडी घातली. व निमगावा तुन चहा घेऊन निघाल्या पासुन ची घडलेली घटना सुसंगत एकही संदर्भ न वगळता कथन केली. ज्या वेळी गणपत पहिलवान चे नाव मी घेतले तेंव्हा बंडोपंत अवाक होऊन घामाघूम झाले होते हे माझ्या लक्षात आले. सर्व घटणा ऐकून बंडोपंत घटाघटा ग्लास भर पाणी प्यायले. थोडे शांत झाले व बोलायला सुरुवात केली "गणपत आमच्या गांवचे पहिलवान होते. पंचकोशित नांव होते. शेतीभाती घरदार होते. परोपकारी व देवभोळी व्यक्ती. बालबोध वळणाची. भरपुर खुराक व व्यायाम या मुळे शरीर बलदंड होते. पण निगर्वी स्वभाव. पहिलवान असलेल्या गणपत ने लग्न केले नव्हते. पांचवर्षापुर्वी           "एक दिवस गावांत मध्य रात्री चार पाच घरांवर दरोडेखोरांनी दरोडे घातले सोनेनाणे रोकड असा कोट्यावधी रुपयांचा ऐवज लुटून ते पळून जात असताना गणपत पहिलवानाने कडवी झुंज दिली. या द्वंद्वात ते जखमी झाले. तरीही त्यांनी पाठलाग करून दोन दरोडेखोरांना आडवे केले.पण धावताना दमछाक झाली होती. त्या अरुंद पुलाच्या दुसर्‍या टोकाला दरोडेखोरांनी गोळी झाडून मारुन टाकले. पोलीस आले पंचनामे झाले. गणपत पहिलवानाचा मरनोउपरांत सत्कार झाले. पण एक ही विधी झाला नाही. कोण करणार हे सारे. वर्षा नंतर कोणी विलास नावाचा पुतण्या उगवला व गणपती ची सारी प्रापर्टी हडप करुन मजा मारु लागला. हळुहळु सारे गणपत पहिलवान यांना विसरून गेले.
मागच्या वर्षी एक म्हातारी जीचे पालन पोषण गणपत करीत होते. ती धावत पळत हाॅटेल मध्ये आली व दम लागलेल्या आवाजात सांगु लागली 'बंड्या अरं गण्या दिसला पुलावरून येतांना पण बोलला नाही." मी चक्रावून गेलो." काल तुला टोकण्याचे कारण कळले का तुला."
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. दरदरून घाम फुटला. आता पर्यंत ज्या घटणा सरळ वाटत होत्या त्यातील खोच कळली होती" म्हणजे रात्री एका भू§§ता समवेत प्रवास केला आपण बापरे "फार फार घाबरलो. माझी परिस्थिती बंडोपंताच्या लक्षांत आली. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला शांत पणे म्हणाले "साहेब हे भूत परोपकारी आहे हे येते का लक्षांत त्याने तुम्हाला काय काय मदत केली ते आठवा. पुलावर भेटुन तुमचे संकट कसे कसे दुर केले ते आहे ते आठवा. गाडी चालवताना तुला जी अनुभुती आली ती पवित्र नाही वाटत तुला? गाडी त तुला त्रास दिला का त्याने." शांत हो. अन एक कर म्हणजे गणपत पहिलवान यांच्या आत्त्माला चिरशांती लाभेल. तु त्यांचे श्राद्ध घाल. त्यांना मुक्ति मिळेल." 
हळूहळू सारे कथन लक्षांत येत होते. एक ठाम विचार मनांत रुप रेषा आकार धरु लागली होती.मनांत थोडी शांतता आली होती. विचार करण्याची क्षमता येउ लागली होती. बंडोपंतांनी सांगितलेले मनात घर करु लागले होते. बंडोपंताना होकार ध्यावा का. काय करावे. गणपतरावांची मुर्ती नजरेसमोर आली. झटकन" हो मी करतो उत्तरकार्य व श्राद्ध बोललो मोठ्या ने". आवाज फार मोठा होतो. बाहेर ऐकू गेले असावे. बंडोपंत खुष झाले. माझ्या सौ ला हे सर्व सांगण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. संध्याकाळचा चहा घेऊन ते तिघेही निमगांवला रवाना झाले. 
एक चांगला मुहूर्त बघुन गणपत पहिलवान चे उत्तरकार्य व श्राद्ध निमगावांत मोजक्या लोकानंसमवेत अत्यंत धार्मिक पणे पार पडले. नैवेद्य पुलाच्या पलिकडे ठेवला. साहेबांनी आकाशाकडे डोळे लावून बघीतले गणपत पहिलवानाची धुसर आकृती आकाशांत विलीन होत होती. निकम साहेबांचे डोळे पाणावले होते. 
👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥
भास्कर पवार पुणे 
दिनांक २६ मे २०२१. @©®

Sunday, May 24, 2026

नियती चा विजय

नियती चा विजय 



काही क्षण आयुष्यांत असे येतांत की, पार कोलमडून जातो माणूस. होत्याच नव्हते होते. आनंदाच्या क्षणी च दुखाःंची किनार सुखाला लागते. असेच झाले, शकुमावसी चा ७५ वा वाढ दिवस मोठ्या  आनंदाने साजरा झाला. आनंदाला उधाण आले होते. सारे नातेवाईक भेटले होते. पण नियतीला हे मान्य नव्हते. अती कडु प्रसंग घडला. सार्‍यांचा लाडका विजय हरपल्याची बातमी धडकली. रजनीचा मावसभाच्याच्या निधनाची बातमी ऐकुन प्रचंड धक्का बसला. विजू गणेश राम लक्ष्मण ची जोडी, दोन भाऊ पण मन एक. पापभिरू स्वभाव. सदैव हसत मुखाने मनापासून आनंदाने स्वागतत्पर. शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणाऱ्या कष्टाळु आशाताई ची लेकरं. तीच्याच संस्कारातुन ताऊन सुलाखून निघालेली ही दोघे, पण काळाने केवढा निर्दयीपणे घाला घातला. आता कुठे सुखी आयुष्याला सुरुवात होती. विजू ने आई सारखीच सारी नाती जपली होती. भाऊ, मुलगा, मामा, वडील, सारी नाती जपली होती.फार मोठा मित्र परिवार, सगेसोयरे यांच्याशी फार फार सलोख्याचे संबध होते. गोरे फॅमिली असो की हेंद्र फॅमेली, सर्वांसी एका प्रेमाच्या धाग्याने जोडुन ठेवले होते. मागच्या महिन्यात विजय गणेश चा समृध्द परिवार, मित्र मंडळी, गणगोत एकत्रीत बघायला मिळाले. आशाताई च्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने. दोघे भाऊ सर्वांचे केवढ्या आगत्याने आनंदाने प्रत्येकाचे स्वागत व आदरातिथ्य करत होते. त्यांना तेवढ्याच प्रमाने साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी अर्चना शिल्पा. एक परिपूर्ण परिवार बघायला मिळाला होता. पण आता विजय नाही. छे ही कल्पना ही सहन करण्याची शक्ती नाही आमच्याकडे. देवा असे नको व्हायला हवे होते. "जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला" हे खरं केलं का. तो तर देवाचे कीती करायचा. व्रत वैकल्ये पुजाआर्चा कधीही नाही विसरला मग असे का? हे दुखः फार   मोठं आहे. परमेश्वराने हे दुखः सहन करण्याची शक्ती गणेश, शारदा, शुभदा, अर्चना,प्रणव,यांना व  विजय वर प्रेम करण्याऱ्या सर्वांनाच, व आम्हालाही द्यावी हीच त्या दयाघनाला प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती ॐ शांती ॐ शांती ॐ 🙏

BRPAWAR: नियती.......चा विजय

BRPAWAR: नियती.......चा विजय: नियती चा विजय  काही क्षण आयुष्यांत असे येतांत की, पार कोलमडून जातो माणूस. होत्याच नव्हते होते. आनंदाच्या क्षणी च दुखाःंची किनार सुखाला लागते...

गर्दी

गर्दी 
 गर्दी वाढली आहे…
रस्त्यांना आता श्वास उरला नाही,
दाटीवाटीच्या लोंढ्यांनी
शहरांची छाती भरुन आली आहे…

कोणी धावत आहे उद्याच्या शोधात,
कोणी कालच्या जखमा लपवत;
काही चेहेरे हास्य फुलवितात,
तर काही आतून तुटत तुटत जगतात…

कोणी विचारांच्या गाभाऱ्यात हरवलेले,
कोणी क्रोधाच्या ज्वाळांनी पेटलेले;
कुणाच्या डोळ्यांत करुणा दाटलेली,
तर कुणाच्या शब्दांत धार विषारी…

अनेक पोषाख, अनेक भाषा,
अनेक धर्म, अनेक दिशा;
कोणी कपाळी गंध लावलेला भक्त,
तर कोणी नास्तिकतेचा ध्वज फडकवीत…

कोणी हात जोडून देव शोधतो,
कोणी माणसांतच देव पाहतो;
कोणी दयाळू, मायेचा झरा,
तर कुणी कठोर दगडासम उभा…

या गर्दीत प्रत्येक जीव
एक वेगळी कहाणी घेऊन चालला आहे;
कोणी हरवलेला, कोणी सापडलेला,
कोणी जगण्याचा अर्थ शोधत आहे…

आणि तरीही—
या अफाट मानवी समुद्रात
सर्वांना हवी असते फक्त
थोडी ओळख…
थोडे प्रेम…
आणि कुणाच्या मनात
आपल्यासाठी राखलेली
एक छोटीशी जागा… 🌹
भास्कर जाधव 


Saturday, May 2, 2026

ते सोन्या चे दिवस

नमस्कार, मी संजय रानडे पुणे. न्यू सिटी हायस्कूल चा 1972 बॅच चा माजी विद्यार्थी.  मी आपल्या धुळे एज्युकेशन सोसायटीच्या तीनही शाळातील विद्यार्थ्यांच्या आठवणीची  " गुरुवंदना -स्मरण सोनेरी क्षणांचे " या पुस्तकाचे दोन भाग प्रसिद्ध केली आहेत.  पुढील भागासाठी आपण आपल्या शिक्षकांच्या आठवणी 30-4-2026 पर्यन्त मला 9503017119 या whatsapp नंबरवर पाठवाव्यात ही विनंती.

Tuesday, April 28, 2026

नाम्या म्हणे

नामा म्हणे देवा
घास घेई पांडुरंगा
उपाशी नको राहु
घास भरवितो देवा!! 
रोडगा तुपात भिजवला
वरण भात ही आणला
जनाबाई नी दिली
चवदार मेथीची भाजी!! 
कांदामुळा देई सावता
घास घेई रे पांडुरंगा
संतजन तिष्ठती महाद्वारी
विडा घेऊनी रुखमिनि माता!!
भास्कर पवार पुणे

सोन्या ला पत्र व त्याचे उत्तर

माझी कन्या सोनल हीचा आज ५० वाढ दिवस. त्या निमित्ताने मी पाठविलेल्या संदेशाची व तीने दिलेलं उत्तर खली उधृत करीत आहे.                            =========         सोन्या बेट्या
आज तु ५१ वर्षात पदार्पण करित आहे.
तुझं सारं बालपण नजरेसमोरून भरभर निघुन गेले. तुझी बालवाडी तर मला आठवतच नाही. सोलापूर ची शाळा श्राविकाश्रम तेवढी आठवते. नंतर रत्नागिरी. नगर पुण्याच्या शाळा महाविद्यालय. पण तुला हाताला धरुन शाळेत सोडण्याचे काही आठवत नाही. तुझे नगरला साजरे झालेले वाढ दिवस आठवतात. काका आई बद्दल चे तुझे प्रेम माया व आदर आठवतो. तुझे लग्न.व सासरी जाणे आठवते. सासर माहेर मधला समतोल राखण्याचा यशस्वी प्रयत्न आठवतो. इशा दिशां च्या बालवाडी, शाळा, काॅलेज,या साठीची धावपळ आठवते. मुलींवर होणारे सुसंस्कार ही दिसत होते. आई नानांना आमच्या जागा तर तु कधीच देऊन टाकल्या. त्यांची केलेली सेवा व सासरच्या, आई व नानांच्या नातेवाईकांना ही आपलेसे केले. नाती तर जपलीच पण मित्रमैत्रिणी यांना ही जपले. भाऊ व बहीण चे नाते तो परदेशी असुन तु ताजे ठेवले. हल्ली हल्ली तर मला काही सल्ला हवा असेल तर तुलाच विचारत असतो. खुप लिहायचै आहे पण नंतर कधीतरी.. तर आज तुझा वाढदिवस आहे तुला वाढ दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा व शुभाशिर्वाद. तूला प्रत्येक कामात शुयश लाभो. तुझी भरभराट होओ. आरोग्यदायी दिर्घ आयुष्य लाभो. भरभरून आशिर्वाद 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🌹🌹🌹 आण्णा                          सोनलचे उत्तर.           *प्रिय अण्णा,*

तुमचा मेसेज वाचला आणि नकळत डोळे भरून आले हो. 

तुम्ही म्हणता तुम्हाला मला हाताला धरून शाळेत सोडल्याचं आठवत नाही... पण अण्णा, तुम्ही कधीच माझा हात सोडला नाही. सोलापूरच्या श्राविकाश्रमापासून पुण्याच्या कॉलेजपर्यंत, लग्नाच्या बोहल्यापासून इशा-दिशाच्या बालवाडीपर्यंत – प्रत्येक वळणावर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, आहे. तो हात मला दिसला नाही, पण जाणवत राहिला.

आई-नानांची जागा मी घेतली असं तुम्ही म्हणता, पण खरं तर तुम्ही-आईनी दिलेले संस्कारच मी पुढे नेतेय. तुम्ही शिकवलंत – नाती जपायची, माणसं जोडायची, आणि कर्तव्याला प्राधान्य द्यायचं. सासर-माहेरचा समतोल, नातेवाईक, मित्रमैत्रिणी... हे सगळं मी केलं नाही, तुमच्या शिकवणीने घडलं.

आज ५१ व्या वर्षात पदार्पण करताना मागे वळून बघते, तर तुमचा अभिमान हेच माझं सगळ्यात मोठं यश वाटतं. आणि तुम्ही सल्ला विचारता म्हणालात... अण्णा, माझ्यासाठी तर तो आयुष्यातला सर्वात मोठा अवॉर्ड आहे 🙏

तुमचे आशीर्वाद आणि आईची माया यामुळेच आज मी आहे. मला अजून काही नको. फक्त तुम्ही दोघं असेच ठणठणीत, आनंदात रहा. तुमचा हात माझ्या डोक्यावर असाच कायम राहू दे.

खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही साष्टांग दंडवत. तुमच्या लेकीला एवढं मोठं केलंत, यातच सगळं आलं.
*तुमचीच लाडकी,* 
*सोन्या* 🌹