भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Saturday, January 11, 2025

👥👥जगतो आहे आपण 👥👥


👥👤जगतो आहे आपण 👤👥
खरंच जेंव्हा मन कोणत्याही तुरंत विचारांत गुंतलेले नसत ना तेंव्हा अनेक विचारांची लाॅटरी लागलेली असते. 
निसर्गाची किमया दिसते पक्षी, प्राणी, ढग, आकाश, झाडे, फुले, सुर्य, चंद्र, तारे, जमीन, समुद्र, नदी, अनेक सुंदर सुंदर चित्रे तरळुन जातांत नजरे समोरुन.. क्षणात चित्र बदलते. पक्षी... बातमी नजरे समोर येते बर्ड फ्लू ची साथ हजारो पक्षी, कोंबड्या याला बळी पडलेल्या दिसतांत. ढग दाटून येतांत अवेळी पाऊस पडत असतो. ढगफुटी, पुर, हजारो लोक बेघर झालेली दृष्ये नजरेसमोरून हालत नाही. समुद्राच्या प्रचंडलाटा, सुनामीच्या आहाकारांच्या बातम्या.. रोगराई, मृत्यू चे थैमान, जमीनी वरुन महायुद्धे, प्रचंड संहार.विमानहल्ले, पुन्हा संहार. अलिकडचा जगाला वेठीस धरून ठेवणारा महामारी चा कर्ता कोरोना, लाखोलोकांचा मृत्यू..... अन आता मनुष्य निर्मीत सोशल मीडिया, डिजीटल, नेटवर्किंग च्या जगभरातील लोकांचा वैयक्तीक डेटा राजरोसपणे नियंत्रित करुन सारी माहिती.. आर्थिक, सामाजिक, राजकीय, गोपनीय माहिती, नैतिक अनैतिक संबंध, सर्वांचा ठाव ठिकाणा, प्रत्येक क्षणाच्या हालचाली, याची माहिती गोळा करून ती विकण्यासाठी साठविण्याची तजवीज या मिडियांनी सुरू केली आहे. प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक माहितीचे वस्त्रहरण करुन त्याचा बाजार होणार आहे. हे संकट नैसर्गिक संकटापेक्षा फार मोठे आहे. आता अल्प प्रमाणात विकली जाणारी नेटवर्किंग साइट वरील माहिती मुळे किती मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावे लागत आहेत हे आपण बघतो आहेच. आपण प्रवासा साठी थोडे सर्च केले कि लगेच टुरिस्ट कंपन्यांचे मेसेज, फोन येणे सुरु होते. एखाद्या वस्तूची चौकशी केली की लगेच फेसबुक वर त्या वस्तूची जाहिरात आपल्या अकौंट ला दिसु लागतांत. हे आजचे चित्र आहे. उध्या सर्वच माहिती सोशल मीडिया वर विकली गेली तर काय होईल साधा सरळ विचार करून पहा... गहजब होईल.. हे वैयक्तिक माहितीचे वस्त्र हरण झाले तर कोणी ही श्रीकृष्ण आपले रक्षण करण्यासाठी येणार नाही. ग्लोबल डिजिटल चा फायदा झाला.. पण तोटा किती होईल हे तज्ञ ही सांगु शकतील का. तुमचे अमुक एक अगदी वैयक्तिक आहे असे भविष्यात म्हणता येईल का? 
एकंदरीत असे जगतो आहे आपण. ज्या प्रमाणे प्रत्येक संकटाने माणसाला काही तरी शिकविले आहे नविन शोध लागले आहेत. आता कोरोना वर लस उपलब्ध झाली आहे. तसेच डेटा संकलना बाबत सर्वर वर काही तरी नियंत्रण ठेवण्यासाठीनवे फिल्टर कोणी तरी शोधून काढेलच. 
या विश्र्वाचे नियंत्रण करणाऱ्या त्या महान शक्ती ने काही तरी तजवीज केली असेल त्या अनंतशक्ती वर विश्र्वास ठेवून जगुया रोज सारखे. 
 👤👥जगत राहु 👥👤
भास्कर पवार 
पुणे अकरा जानेवारी २०२१

No comments: