भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Saturday, December 14, 2024

मन माझे

मनमाझे🍂🍂🍁🍁🍁
*कीती रुटीन होऊन जाते ना जगणे आणी जीवन . आलेला गोड कडु प्रसंग मागे टाकून पुढे जगतांना एक सल कायमचा मनांत राहुन जातो . काही तरी चुकले आहे  . काही तरी विसरले आहे . कायबरं इतक्यांत नविन विचार त्याची जागाघेतो व प्रबळ होतो . असे मनाचे चक्र सुरू असते . निर्विकार मन कधीकाळी होइल ह्या आशेवर आपले जगणे सोपे करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात . दोन विचारातील पॉज वाढविण्यासाठी ही मनाचे प्रयत्न सुरू होतात  . आपले मन आपल्यालाच उमगत नाही  . हे उमगणे जर साध्य झाले तर कीती छान होइल  . असे खरे होइल  ? *                                            भास्कर पवार 🍀🍀🍀🍀🍀

No comments: