*मामाचे पत्र
माझ्या मामाचे पत्र हरवले
ते मला सापडले!!📩✉️📧📩✉️📧📨🙌
==============
माझ्या भाचरांनो
कसे व्यक्त व्हावे हेच कळत नाही .मामावर एवढं प्रेम करणारे भाचे मिळाले हे माझे भाग्य च आहे .मामा तुमचाच आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण तुम्ही तिघांनी मामीही मिळवली ती तुमच्या कष्टाने व प्रेमाने .मामी तुमच्या बद्दल भरभरुन बोलत असते .काही वेळा मी चिडून जाऊन रागांत तुम्हाला बोललो तरी मामी अगदी शांतपणे माझी चुक निदर्शनास आणून देते व मला ही माझी चूक पटते, कळते .आपण व मुलीने ने केवढी छान भेट दिली आहेमला, या वयांत माझी निकड ओळखुन "आता आराम करा "हे वस्तू तुन मला सांगीतले हा केवढा आनंद आहे ना .तुमच्या मातोश्री नि सुध्दा हाच विचार केला असता .नव्हे तर आज ती जेथे असेल तेथुन बघत असेल व डोळे भरून आले असतील व आपल्या मुलांनी मामाशी घट्ट केलेले नाते तीला खुप खुप आवडले असणार .तुम्ही तिघेही माझ्या जवळपास आहांत हा आधार जगण्याची उमेद देतो व आरामदायी जगण्याचे सिंहासन तुम्ही मला दिले आहे .मी आभार नाही मानणार कारण मला परके नाही व्हायचे .हिच भाचरे जन्मोजन्मी मिळावेत अशी देवाजवळ प्रार्थना करतो . आपला च
असणारा
तुमचाच
मामा*

No comments:
Post a Comment