भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Monday, January 13, 2025

टिम वर्क 🙏धैर्य दाखवणारे आधिकारी 🙏

खरंतर रा प महामंडळाच्या सेवेत सामावून जाणे प्रत्येक आधिकार्यांचे टिम वर्क च्या स्किल वर अवलंबुन आहे तसेच ही नोकरी मनापासून करित आहोत की पाट्या टाकीत आहोत .यावर अवलंबून आहे .काही काही विभागात हे टिमवर्क इतके छान असते की काम करण्यास खरोखरच आनंदी आनंद असतो .एका विभागात काम करित असतांना अतिशय सुंदर टिमवर्क बघायला मिळाले .रात्रीचे दोन वाजले होते रा प आधिकारी वसाहतीत जीप 🚙 आल्या चा आवाज आला वरुन गॅलरीतून डोकावुन बघतीले विभागीय वहातुक आधिकारी गडबडीने चालकास कुणाला तरी बोलावुन आणावयास सांगत होते .घाईने खाली आलो कुठेतरी अपघात झाला होता .माझ्या पाठोपाठ डीटीएस ,विभागीय सांख्यिकी ,लेखाधिकारी ,भांडार आधिकारी .खाली जीप जवळ येऊन थांबले होते .येवढ्यात आणखी एक जीप आली .एव्हाना 9/10 आधिकारी आले होते .व हे सर्व घडले केवळ आठ दहा मिनिटात .एक प्राणघातक अपघात झाला आहे एवढेच कळले होते .व दोन्ही जीप मध्ये जागामिळेल तसै आधिकारी बसले व जीप वेगाने अपघात स्थळी पोहचल्या .अपघात अत्यंत भिषण होता एका बसचा जोरात धक्का बसुन एक पांढरी कार रस्ता च्या बाजुला असलेल्या खड्डय़ात उलटी पडली होती .व बस ची चाके खड्डा च्या दोन्ही बाजूला रुतून बसली होती .इतक्यात लोकल डेपो मॅनेजर व चार पाच मेकॅनिक बस घेऊन घटणा स्थळी आले .आगार प्रमुखाने प्रथम अपघात ग्रस्त बस रोप लाऊन दुसर्‍या बस ला बांधुन मागे ओढुन काढली .आता खड्यांत पडलेली कार दिसत होती .त्या त किती आणी कोण लोक होते काही कळायला मार्ग नव्हता .तेव्हड्यात आगारातुन क्रेन आली .लागलीच खड्ड्यातील कार बाहेर काढली. आंत काय घडले असेल ?  सर्व च आधिकारी गंभीर दिसत होते .आतापर्यंत धावा धाव करू व प्रसंगी स्वतः जमेल तशी मदत करणारे आधिकारी अगदी स्तब्ध झाले.कार सरळ चार चाकावर उभी केली गेली .आंत डोकावुन पाहिले आंत पांच व्यक्ती होत्या .त्याच वेळी पोलीस ही घटणास्थळी पोहचले .वायरलेस करून त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स मागवली .दोन व्यक्ती जीवंत पण बेशुद्ध दिसत होत्या .कार मधील पर्स मध्ये असलेल्या कागदपत्रे व ओळखपत्रे बघता ती फॅमिली मुंबई ची होती .पोलीस वायरलेस वरुन त्यांच्या नातेवाईकांसी संपर्क साधून झालेल्या दुर्घटनेबद्दल माहिती देय होते .सर्व जखमी व मृत व्यक्तीना मुंबई ला नेण्यात यावे असे ठरले .व अम्ब्युलन्स मधुन जखमी व एसटी बस मधुन मृत देह नेण्यासाठी ची तयारी झाली .बस मध्ये दोन एसटी चे निरिक्षक व अम्ब्युलन्स मधुन एक नर्स स्वतः हुन मुंबई स जाण्यासाठी तयार झाले .दोन्ही गाड्या मार्गी लागे पर्यंत दिड दोन तांस गेले .नंतर पोलीस पंचनामा इ.इ. सोपस्कार .जाबजबाबाचे कार्य सुरू झाले .रस्त्यावरची सारी कामे उरकून लोकल डेपोला साधारण सकाळी दहा वाजता सारे आधिकारी आले .आगार व्यवस्थापक च्या कॅबीन मध्ये बसले कोणी एक शब्द ही बोलत नव्हते .आगार प्रमुखांच्या चेहरा बघवत नव्हता .डोळे पाणावले होते .हुंदका येणे काय बाकी होते .एक मेकांना नजरेने समजावत होतो .इतरवेळी इतका गपीष्ट व मिस्कील असणारा हा आगार प्रमुख अगदी वेगळ्या अवस्थेत बघीतला .कुणीतरी पाणी आणले .चहा आणला .मुकाट्याने घहा पाणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो .केवढे मोठे सांघीक कार्य हे .कुणीही आधिकार्यांने मी लेखा शाखेत काम करतो, मी सुरक्षा खात्यात काम करतो .मी तर स्टॅट आहे ,मी सिव्हिल इंजिनिअरिंग चा आहे असा विचार केला नाही .सर्व एसटी चे आधिकारी म्हणून एकत्र ,एकजिनसी पणाने एकत्र येऊन एक महत्त्वाचे कर्तव्य पार पाडले .हा एसटी आधिकार्यांचा न शिकवलेला गुण मला फार फार भावतो .आवडतो .इतर मतभेद दुर ठेऊन संकटात हे टीम वर्क कल्चर फार आनंदादायी आहे .अन आज जो इतका मोठा ग्रुप तयार झाला आहे त्याच्या मुळाशी हेच कारण असावे .
असे वेगवेगळे अनेक किस्से माझ्या ३७ वर्षाच्या सेवा काळांत घडले आहेत . एकीचे व सहकार्य ने प्रश्रांची उकल होते .अशा अनेक   स्मृती जाग्या आहेत .पुन्हा एक एक लिहायचे आहे .आपल्याही सेवा काळांत अशा घटणा नक्कीच घडल्या असणार आहेत .  स्मरणात असतीलच काही आठवणी तर मग "लिहिते व्हा मित्रांनो "
(सदर घटणेतील विभाग रत्नागिरी आहे व कथेचे नायक आहेत अनिलराव पवार आगार प्रमुख चिपळुण आगार )
भास्कर पवार पुणे ®©©

No comments: