आत्मा ,विज्ञान ,आध्यात्मिक!!
हल्ली चे युग हे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासुनच स्विकारायची हेच शास्त्र झाले आहे .केवळ श्रध्देवर एखाद्याचे म्हणणे सत्य मानण्यात श्रध्दा खोडा घालत असते .त्या मुळे आत्म्याच्या आस्तित्वा बद्दल दुमत असणे सहाजिकच आहे .पण श्रध्दावानांचे ठाम मत आहे की आत्मा आहे .पण प्रत्यक्षात तो दिसत नाही व म्हणूनच विज्ञानाच्या कसोटीवर हे विधान उतरत नाही .पण जेंव्हा हे विधान आध्यात्मिक भाषेत विश्लेषण करुन सांगीतले जाते तेंव्हा मात्र ते विज्ञानाच्या साच्यात बसते .आत्माचे विकृत स्वरूप म्हणजे भुते खेते यावर च्या तथाकथित भितीदायक कथांना आवडीने ऐकणारे व लिहीणार्यांची संख्या फार मोठी आहे .आधुनिक जगातील सर्व च भागातील बरेच लोक भुते मानणारे आहेत .अमेरिका सारख्या देशात ही हॅलोविन च्या वेळी घराबाहेर भोपळे व भितीदायक सांगाडे व
आकृत्या ठेवतात .पण आत्मा आहे म्हंटल्यावर दाखवा ,पुरावा ध्या म्हणतांत .म्हणून हा संभ्रम दूर करण्यासाठी आध्यात्मिक असणे गरजेचे आहे .त्या मुळेच आपण विज्ञानाच्या कसोटीवर आत्म्याचा वास आहे हे जाणु शकु .
भास्कर पवार पुणे @®©©

No comments:
Post a Comment