भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Sunday, May 24, 2026

नियती चा विजय

नियती चा विजय 



काही क्षण आयुष्यांत असे येतांत की, पार कोलमडून जातो माणूस. होत्याच नव्हते होते. आनंदाच्या क्षणी च दुखाःंची किनार सुखाला लागते. असेच झाले, शकुमावसी चा ७५ वा वाढ दिवस मोठ्या  आनंदाने साजरा झाला. आनंदाला उधाण आले होते. सारे नातेवाईक भेटले होते. पण नियतीला हे मान्य नव्हते. अती कडु प्रसंग घडला. सार्‍यांचा लाडका विजय हरपल्याची बातमी धडकली. रजनीचा मावसभाच्याच्या निधनाची बातमी ऐकुन प्रचंड धक्का बसला. विजू गणेश राम लक्ष्मण ची जोडी, दोन भाऊ पण मन एक. पापभिरू स्वभाव. सदैव हसत मुखाने मनापासून आनंदाने स्वागतत्पर. शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणाऱ्या कष्टाळु आशाताई ची लेकरं. तीच्याच संस्कारातुन ताऊन सुलाखून निघालेली ही दोघे, पण काळाने केवढा निर्दयीपणे घाला घातला. आता कुठे सुखी आयुष्याला सुरुवात होती. विजू ने आई सारखीच सारी नाती जपली होती. भाऊ, मुलगा, मामा, वडील, सारी नाती जपली होती.फार मोठा मित्र परिवार, सगेसोयरे यांच्याशी फार फार सलोख्याचे संबध होते. गोरे फॅमिली असो की हेंद्र फॅमेली, सर्वांसी एका प्रेमाच्या धाग्याने जोडुन ठेवले होते. मागच्या महिन्यात विजय गणेश चा समृध्द परिवार, मित्र मंडळी, गणगोत एकत्रीत बघायला मिळाले. आशाताई च्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने. दोघे भाऊ सर्वांचे केवढ्या आगत्याने आनंदाने प्रत्येकाचे स्वागत व आदरातिथ्य करत होते. त्यांना तेवढ्याच प्रमाने साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी अर्चना शिल्पा. एक परिपूर्ण परिवार बघायला मिळाला होता. पण आता विजय नाही. छे ही कल्पना ही सहन करण्याची शक्ती नाही आमच्याकडे. देवा असे नको व्हायला हवे होते. "जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला" हे खरं केलं का. तो तर देवाचे कीती करायचा. व्रत वैकल्ये पुजाआर्चा कधीही नाही विसरला मग असे का? हे दुखः फार   मोठं आहे. परमेश्वराने हे दुखः सहन करण्याची शक्ती गणेश, शारदा, शुभदा, अर्चना,प्रणव,यांना व  विजय वर प्रेम करण्याऱ्या सर्वांनाच, व आम्हालाही द्यावी हीच त्या दयाघनाला प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती ॐ शांती ॐ शांती ॐ 🙏

No comments: