एका पवित्र आत्माची कथा.......... पुर्वी प्रशिध्द केली होती आता पुन्हा नविन मेंबर साठी खाली देत आहे.
"गणपत पहिलवान "
👥👥👥👥👥👥
अंधारी रात्र होती. पल्ला लांबचा होता. तसे कामे उरकून निघायला उशीर च झाला होता. स्वताची कार असल्याने दिडशे किलोमीटर चे अंतर दोन तासांत पार करणे सहज शक्य होते. घरी फोन करुन कळविले होते.प्लेअर वर झक्क पैकी कुमार गंधर्वांचे "जमुना किनारे मेरा गांव रे सावरे ऐएयो" हे शास्त्रीय संगीतातील मीश्र किराणा रागातील बहारदार गित लावले, त्या धुंद करणाऱ्या सुरावटीत व मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना एक आगळाच आनंद होत होता. साधारण अर्ध्या अंतरावर निमगांव आले. नेहमीच्या हाॅटेल जवळ गाडी उभी केली. मालक बंडोपंत बडी आसामी माझे चांगलेच मित्र होते. ते शहरांत येत तेंव्हा घरी एक तरी चक्कर मारीत मला पाहाताच गल्ल्यावरुन बाहेर येत' या या निकम साहेब अलभ्य लाभ. नेहमी प्रमाणे गळाभेट झाली. त्यांनी स्वतः तयार केलेला मस्त पैकी फक्कड चहा प्यायला दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा निघाल्या. अर्धा तास कसा निघून गेला कळलेच नाही. "
उध्या येतो शहरात तुप निघणार आहे ते घेऊन येतो दोन कामे आहेत तीपण करता येतील" बंडोपंत म्हणाले.दहा वर्षा पासुन अस्सल गावरानी तुप घरपोच करण्याचा शिरस्ता होता. निघतो आता मी बंडोपंताचा निरोप घेतला त्यांनी घड्याळ बघीतले रात्री चा सव्वा वाजला होता. "इतक्या रात्री जाणार का एकटे" त्यांनी टोकले.जातो की नेहमीचा रस्ता आहे दिड तासांत पोहोचले घरी. व हात हलवत अच्छा करून गाडी ला स्टार्टर मारला. मागचे सुंदर अलाप पुर्ण गाणे सुरू झाले. हा रस्ता जास्तच सुनाट होता. रस्त्यावर अंधार होता. सर्वत्र सामसूम होती. अंधारात प्रखर हेडलाईट चे झोत तेवढा तेवढा रस्ता उजळुन टाकत होते. साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर एक अतिशय अरुंद पुल लागला अनेक वेळा या पुलावरून गेलो आलो होतो. हेडलाईट च्या प्रखर प्रकाशात ' पुल संपतो तेथे काही तरी हालचाल दिसली. एक व्यक्ती पांढरा शर्ट व पायजमा घातलेली हात हलवून गाडी थांबवण्यासाठी इशारा करीत होती.मी समजलो लिफ्ट हवी असेल म्हणून त्याने इशारा केला होता. मी त्वरित गाडी थांबवली. साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षे वयाच्या व धडधाकट शरीर यष्टी असलेल्या त्या व्यक्तीने नमस्कार करून शहरात जायचे आहे नेता का गाडीने म्हणून शांत आवाजांत आर्जव केले. मी मागचे दार उघडले व त्या ला आंत घेतले. आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला.
'फार आभारी आहे साहेब' आतला माणूस धीरगंभीर आवाजांत बोलला. कारचे आंतील दिवे बंद असल्याने ती व्यक्ति मला समोरच्या आरशात दिसत नव्हती. मी काही तरी बोलायचे म्हणून बोललो' पाहुणे कुठले म्हणायचे 'निमगाव चा'उत्तर आले.' काय नांव? 'गणपत पहेलवान' '' अशी प्रश्र उतरं चालु होती.
अचानक समोरच्या रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रस्ता अडविण्यात आल्याचे
दिसले.थांबा थांबा साहेब गणपत चा आवाज आला. मागे रिव्हर्स घ्या थोडी गाडी मी थोडी गाडी मागे घेतली. हं आता दाबा एक्सिलेटर. माझ्या उजव्या पायावर प्रचंड दाब आला आहे असे भासले. गणपत शेजारी सिट वर आला बसला आहे असे मला वाटते. एक्सिलेटर वर दाब पडला गाडी झटका देऊन सू करत निघाली. मला कांही ही कळले नाही पण एका मिनिटात जेथे फांद्या पडलेल्या होत्या त्यावरुन वेगाने गाडी पुढे जात होती व अचानक भास झाला गाडी हवेतुन जात आहे. अडथळा मागे गेला आहे हे समजत होते पण एक्सिलेटर वरचा पायाचा दाब कायम होतां आजुबाजुला मानसांचा घोळका आरडाओरडा करत आहे असे वाटले. गाडी सुसाट वेगाने रस्त्यावर धावत होती. आता पायावर चा दाब कमी झाला आहे. हे जाणवले. गाडी चा वेग कमी केला. काय घडले ते कळलेच नाही. शेजारी तर कोणी नाही. भास असेल मनाची समजूत घालून "काय गणपत राव शहरांत कुठे जायचे आहे." म्हणून विचारले. साहेब नाक्यावर सोडा मी जाईन तेथुन."नाके आले गाडी थांबवली मागचा दरवाजा उघडला. गणपत पहिलवान खाली उतरून माझ्या खिडकी जवळ आले. व हात जोडून म्हणाले फार फार उपकार झाले साहेब. इतक्या रात्री मला आपण गाडी त आणले येतो. हे बोलतांना त्यांचा चेहरा उजाळून निघाला आहे असे मला वाटले.
घरी पोहचलो.सौ ने दार उघडले. 'चहा ठेवु का विचारले. समोर भिंती वरच्या घड्याळांत बघीतले पावणेतीन वाजले होते. आता झोपलो तर चार तास तरी झोप होईल. चहा नको म्हणून सांगीतले. फ्रेश होऊन अंथरुणावर अंग टाकले.
सकाळी विकी' बाबा उठा बाबा उठा करित आला. बाबा बंडोपंत काका आले आहेत. फ्रेश होऊन बैठकीत आलो बंडोपंत त्यांचा मुलगा व ड्रायव्हर आलेले होते.तुप,खरवसाचे दुध, फरसाण, कलाकंद, व भरपूर ताज्या भाज्या घेऊन बंडोपंत आले होते. बंडोपंत का कुणास ठावूक पण सारखे माझ्या कडे बघत होते. मला काही कळत नव्हते. तेवढ्यात नाष्टा चहा आला. चहा नाष्टा उरकून बंडोपंत.,
त्यांचा मुलगा ,जीपचा चालक बाहेर जाण्यासाठी निघाले.सौ ने त्यांना दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिलेच. बंडोपंत म्हणाले 'मी येतो वहिनी जेवायला पण या दोघांना खरेदी ची बरीच कामे आहेत ती सगळी उरकण्यात फार वेळ जाईल त्यांना बाहेर च घेऊ देत जेवण. ते तीघेही बाहेर पडले. मी पण स्नान वगैरे करुन कालच्या सर्व कामाचा अहवाल लिहीण्यास बसलो. दुपारी एक वाजता अहवाल पुर्ण करुन वरिष्ठ ना मेलने पाठवीला. व जरा निवांत झालो. कालचा संपूर्ण दिवस व रात्र तसी गडबडीतच गेली होती. अन गणपत पहिलवान नजरे समोर आला. एक सुसंस्कृत व चांगला माणुस होता तो. मनातल्या मनात सर्टिफिकेट देऊन मोकळा झालो होतो मी. पण अडचणी च्या वेळी माझ्या पायांत येवढी ताकद कशी आली. अन रस्ता कोणी अडविला होता. जाऊदे जे असेल ते असो. इतक्यात बंडोपंत आले. जेवणे करून आम्ही दोघे घरातील आॅफिस मध्ये येऊन बसलो. सकाळपासून बंडोपंत काही तरी ऐकण्यासाठी सांगणासाठी उत्सुक होते असा माझा अंदाज खरा ठरला. त्यांनी पहिला प्रश्र केला "रात्री काय घडले"?
असं का विचारताय म्हंटल्यावर ते म्हणाले "पहाटे आम्ही येत असतांना रस्त्यावर झाडांच्या फांद्या तोडून रस्ता आडविला गेला होता असे दिसले. या रस्त्यावर असे प्रकार अधुन मधुन होत असतात. पण पोलीसांनी येऊन रस्ता मोकळा केला होता. नाक्याजवळ पोलीस व्हॅन उभी होती ओळखीच्या इन्स्पेक्टर ने सांगितले. त्यांना कुणी तरी फोन करून सांगितले होते म्हणे. निकम साहेब तुम्ही भर रात्री त्या रस्त्यावरून आलांत म्हणून सकाळपासून चैन पडली नाही. तुम्हाला बघुन बरे वाटले. "
मला रात्रीचा प्रवास व प्रसंग डोळ्यासमोर आला. मी उठुन प्रथम दाराला कडी घातली. व निमगावा तुन चहा घेऊन निघाल्या पासुन ची घडलेली घटना सुसंगत एकही संदर्भ न वगळता कथन केली. ज्या वेळी गणपत पहिलवान चे नाव मी घेतले तेंव्हा बंडोपंत अवाक होऊन घामाघूम झाले होते हे माझ्या लक्षात आले. सर्व घटणा ऐकून बंडोपंत घटाघटा ग्लास भर पाणी प्यायले. थोडे शांत झाले व बोलायला सुरुवात केली "गणपत आमच्या गांवचे पहिलवान होते. पंचकोशित नांव होते. शेतीभाती घरदार होते. परोपकारी व देवभोळी व्यक्ती. बालबोध वळणाची. भरपुर खुराक व व्यायाम या मुळे शरीर बलदंड होते. पण निगर्वी स्वभाव. पहिलवान असलेल्या गणपत ने लग्न केले नव्हते. पांचवर्षापुर्वी "एक दिवस गावांत मध्य रात्री चार पाच घरांवर दरोडेखोरांनी दरोडे घातले सोनेनाणे रोकड असा कोट्यावधी रुपयांचा ऐवज लुटून ते पळून जात असताना गणपत पहिलवानाने कडवी झुंज दिली. या द्वंद्वात ते जखमी झाले. तरीही त्यांनी पाठलाग करून दोन दरोडेखोरांना आडवे केले.पण धावताना दमछाक झाली होती. त्या अरुंद पुलाच्या दुसर्या टोकाला दरोडेखोरांनी गोळी झाडून मारुन टाकले. पोलीस आले पंचनामे झाले. गणपत पहिलवानाचा मरनोउपरांत सत्कार झाले. पण एक ही विधी झाला नाही. कोण करणार हे सारे. वर्षा नंतर कोणी विलास नावाचा पुतण्या उगवला व गणपती ची सारी प्रापर्टी हडप करुन मजा मारु लागला. हळुहळु सारे गणपत पहिलवान यांना विसरून गेले.
मागच्या वर्षी एक म्हातारी जीचे पालन पोषण गणपत करीत होते. ती धावत पळत हाॅटेल मध्ये आली व दम लागलेल्या आवाजात सांगु लागली 'बंड्या अरं गण्या दिसला पुलावरून येतांना पण बोलला नाही." मी चक्रावून गेलो." काल तुला टोकण्याचे कारण कळले का तुला."
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. दरदरून घाम फुटला. आता पर्यंत ज्या घटणा सरळ वाटत होत्या त्यातील खोच कळली होती" म्हणजे रात्री एका भू§§ता समवेत प्रवास केला आपण बापरे "फार फार घाबरलो. माझी परिस्थिती बंडोपंताच्या लक्षांत आली. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला शांत पणे म्हणाले "साहेब हे भूत परोपकारी आहे हे येते का लक्षांत त्याने तुम्हाला काय काय मदत केली ते आठवा. पुलावर भेटुन तुमचे संकट कसे कसे दुर केले ते आहे ते आठवा. गाडी चालवताना तुला जी अनुभुती आली ती पवित्र नाही वाटत तुला? गाडी त तुला त्रास दिला का त्याने." शांत हो. अन एक कर म्हणजे गणपत पहिलवान यांच्या आत्त्माला चिरशांती लाभेल. तु त्यांचे श्राद्ध घाल. त्यांना मुक्ति मिळेल."
हळूहळू सारे कथन लक्षांत येत होते. एक ठाम विचार मनांत रुप रेषा आकार धरु लागली होती.मनांत थोडी शांतता आली होती. विचार करण्याची क्षमता येउ लागली होती. बंडोपंतांनी सांगितलेले मनात घर करु लागले होते. बंडोपंताना होकार ध्यावा का. काय करावे. गणपतरावांची मुर्ती नजरेसमोर आली. झटकन" हो मी करतो उत्तरकार्य व श्राद्ध बोललो मोठ्या ने". आवाज फार मोठा होतो. बाहेर ऐकू गेले असावे. बंडोपंत खुष झाले. माझ्या सौ ला हे सर्व सांगण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. संध्याकाळचा चहा घेऊन ते तिघेही निमगांवला रवाना झाले.
एक चांगला मुहूर्त बघुन गणपत पहिलवान चे उत्तरकार्य व श्राद्ध निमगावांत मोजक्या लोकानंसमवेत अत्यंत धार्मिक पणे पार पडले. नैवेद्य पुलाच्या पलिकडे ठेवला. साहेबांनी आकाशाकडे डोळे लावून बघीतले गणपत पहिलवानाची धुसर आकृती आकाशांत विलीन होत होती. निकम साहेबांचे डोळे पाणावले होते.
👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥👥
भास्कर पवार पुणे
दिनांक २६ मे २०२१. @©®

No comments:
Post a Comment