भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Thursday, March 20, 2025

चिऊताई चिऊताई दार उघड

🦫 चिऊताई चिऊताई दार उघड    🦫                        एक गोजिरवाणे चिमनीचे पिलु हळुच खांद्यावर घेऊन बसले. चिवचिवले," मी त्या काऊ च्या शोधात आहे, माझ्या घरट्यासी येवुन विनवणी करीत होते चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, पण माझी आई मला आंघोळ घालत होती. थोड्या वेळाने पुन्हा दार खडखडले "चिऊ ताई चिऊताई दार उघड. पण आई मला तिट लावत होती. काऊ परत थोड्या वेळाने आला व विनऊ लागला चिऊताई चिऊताई दार उघड, माझी आई म्हणाली 'थांब माझ्या बाळाला दूधभात भरवते. काऊ पुन्हा उडुन गेला. तो काऊ दिसला का हो तुम्हाला कोठे." तो काऊ माझ्या आईला चिऊताई म्हणत होता, म्हणजे तो माझा मामाच ना, त्याला शोधतो आहे मी. खुप ठिकाणी शोधले पण नाही दिसला..' आता कळले का ते पिलु खांद्यावर घेऊन बसले ते.काय सांगणार त्याला. मानवाच्या      हव्यासापोटी जंगले नष्ट झाली. सिमेंट काॅनक्रेटची जंगले वाढली पक्षी प्राणी कधिही न येण्या साठी निघुन गेली., शहरांत दहाव्या ला पिंडाला शिवायला ही काऊ शिल्लक नाहीत. चिऊताई चा चिवचिवाट कानावर पडत नाही. माझ्या मनातले हे विचार त्याला कळले असावेत दोन अश्रू खांद्यावर पडले. ते चिमणी चे पिलु उडुन गेले.. कधीच न परतण्यासाठी. 🦫🦫🦫🦫🦫🦫🦫🦫🦫🦫🦫
(आज जागतिक चिमणी दिवस आहे)
भास्कर पवार पुणे ©®

No comments: