रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
लक्षांत राहीले शब्द माझ्या तेवढे च
कासाविस करणारी आर्द्रता ओतप्रोत
कंठातुन जाणवला मनाची ती घुटमत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
स्वरतुझे ओथंबलेले आपुलकीचे सागर
भैरवी नकोच गायला अशीच ती तोडी
का सरलीती भावलाट उसळती माघारी!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
पुन्हापुन्हा फिरलो शोधायला पाऊलखुणा
एखादा अस्पष्ट स्वर प्रतिध्वनीचा ऐकायला
निर्माल्य आपल्या एकरुपतेची शोधायला
फेसाळलेल्या पुसट रेषांच्या भुलभुलय्यांत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
ऐकले आहे स्वर अमर असतांत विश्र्वात
भुपाळी न गायलेले स्वर तुझे शोधत आहे
आताशा तर सारेच विसरायला होतं आहे
चेहेरा तुझा अस्पष्ट झाला, स्वर अधोरेखीत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
लक्षांत राहीले शब्द माझ्या तेवढे च
कासाविस करणारी आर्द्रता ओतप्रोत
कंठातुन जाणवला मनाची ती घुटमत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
स्वरतुझे ओथंबलेले आपुलकीचे सागर
भैरवी नकोच गायला अशीच ती तोडी
का सरलीती भावलाट उसळती माघारी!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच
पुन्हापुन्हा फिरलो शोधायला पाऊलखुणा
एखादा अस्पष्ट स्वर प्रतिध्वनीचा ऐकायला
निर्माल्य आपल्या एकरुपतेची शोधायला
फेसाळलेल्या पुसट रेषांच्या भुलभुलय्यांत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'त
ऐकले आहे स्वर अमर असतांत विश्र्वात
भुपाळी न गायलेले स्वर तुझे शोधत आहे
आताशा तर सारेच विसरायला होतं आहे
चेहेरा तुझा अस्पष्ट झाला, स्वर अधोरेखीत!!
रागाऊ नकोस म्हणाली तेही'रागा'तच

No comments:
Post a Comment