भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Tuesday, January 6, 2026

ओसाड माळावर आम्रवृक्षांचा फुलला मोहर

ओसाड माळावर आम्रवृक्षांची 
फुलविल्या रम्यः बागा
हाडाचा तु भुमी पुत्र, शेतकरी, 
कष्टकरी महान कष्टाळु!! 
रोपटी आणली दुरवरुन
लावली आळेकरुन स्व हस्ते 
शिंपले जल तु स्व कष्टाने,
जलकुंभे दुरवरुन वाहुनी!!
दुरवर जरी चाकरी सरकारी 
तोल सावरीत केली कसरत
नाही कोठे भासविले दुरत्व 
अविरत श्रमात मानला आनंद!!
संयम, सात्विकतेचा नाही अभाव 
मदतीचा हात सदा असे पुढे 
जनसेवा चे अंगीकारले ब्रिद
आदर लहान थोरांसी समान!!
अशा मोहरलेल्या वृक्षाला देवा 
लागुदेत सुवर्ण फळे छान गोड
बहरेल आम्रबाग या ओसाड रानात
सख्या सख्खा शेजारीमाझा
 खरा शेतकरीराजा !!
भास्कर पवार पुणे 
५ जानेवारी २०२६.

No comments: