१९७७ चा काळ होता तो .मी बीड विभागात विभागीय सुरक्षा निरिक्षक म्हणून कामगिरी वर होतो .बस स्थानकाच्या समोर च्या आरटीडी च्या कॉर्टर मध्ये जागा मिळाली होती .पत्नी ,दोन मुलं व आई वडील यांचे समवेत वास्तव्यास होतो .एस टी चा स्वतंत्र नवीन विभाग होता .काही सुरक्षा रक्षक भारतीय सैन्य दलातील होते .एक कांबळे म्हणुन पुर्वी नायब सुभेदार असलेले शिस्त प्रिय सुरक्षारक्षक विभागीय कार्यालयात नोकरीत होते .अतिशय बेडर विश्र्वासु व आज्ञाधारक स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय होतै .त्यांचा एक २०/२२ वर्षेवयाचा मुलगा सुभाष याला आमचे वडील विनामुल्य शिवण काम शिकवित असत .त्या मुळे त्या दोघांची चांगली गट्टी जमली होती .व सुभाष वडिलांना काका संबोधु लागला होता .साधारण सहा महिन्यांत तो बर्यापैकी कपडे शिवू लागला . सुभाष व त्यांचे एक भावनिक नाते निर्माण झाले होते . त्याचे लग्न ठरल्याचे कळले तेंव्हा वडीलांना आनंद झाला .एक दिवस वडील म्हणाले सुभाष दोन दिवसांपासून आला नाही .मी त्याच्या वडीलांना विचारुन सांगतो असे सांगून टुर वर गेलो .एक दिवस बाहेर मुक्काम होता त्यामुळे दुसर्या दिवशी संध्याकाळी घरी परतलो .तेंव्हा कळले की सुभाष आजारी असुन तो जनरल हाॅस्पिटल बीड ला अडमीट आहे .वडील सकाळी त्याला भेटुन आले होते .दुसर्या दिवशी सकाळी जाऊन मी भेटलो त्या वेळी बरेच रिटायर सैनिक ही तेथे होते .डॉ सी बोलुन ट्रिटमेंट बाबत माहिती घेतली .कांबळे यांना काही मदत हवी का विचारले .सुभाष ची लग्नाची तारीख आठ दिवसावर आली आहे कळले .पण आठदिवसांत सुभाष पुर्ण बरा होईल की नाही याची शंका आली .कांबळे यांना त्या बद्दल बोललो त्यांनाही ते जाणवले असावे .ते मुली कडील लोकांसी बोलतो म्हणाले .थोडीफार आर्थिक मदत करुन मी घरी परतलो .
कामकाज ,चेकींग ,यांत पुरता अडकलो .सुभाष च्या लग्नाच्या आदल्या दिवशी उशीरानेच परतलो .वडील थोडे विवंचनेत दिसले .कारण तेच होते सुभाष ला अध्याप बरेवाटत नव्हते .व तब्येत जास्त ढासळली होती .अशा मनस्थितीत वडील बरेच वेळ जागे होते .दुसर्या सी नाते जुळवणे त्यांना फार चांगले जमत असे .
रात्री केंव्हा तरी दाराची कडी एकदा वाजली ,पुनः एकदा वाजली .'काका 'काका 'अशा हाका आल्या आवाज सुभाष चा होता .आम्ही दोघेही दरवाजा जवळ गेलो .पुन्हा एकदा "काका काका "आवाज आला .दाराची कडी काढुन दाल उघडले .बाहेर चा लाईट लावला .आसपास पाहीले कोन्हीही दिसले नाही .थोडे बाहेर जाऊन पाहिले ,कुणीच नव्हते .कसली चाहुल ही नव्हती .पण कडीकोयंडा चा आवाज व सुभाष चा आवाज आम्ही दोघांनीही ऐकला होता .दार बंद करून परत घरांत येऊन बसलो .भास असेल असे समजून परत झोपण्याची तयारी केली .आता घडय़ाळात पहाटेचे चार वाजले होते .दाराजवळ तीन चार लोकांचा आवाज आला त्या पाठोपाठ 'साहेब साहेब हाका आल्या .सुरक्षा रक्षकांचा आवाज होता .दार उघडले तीन चार सुरक्षारक्षक व एक कुली समोर उभे दिसले .."साहेब कांबळेंचा मुलगा गेला "एकाने गदगदलेल्या स्वरांत सांगितले .एकदम शांतता पसरली .काही वेळा नंतर विचारले कधी झाले हे . साडे तीन वाजता .एक जण पुटपुटला .लक्षात आले साधारण पणे त्याच वेळी आमच्या घराचे दार वाजले होते ."तुम्ही चला मी आलोच " सांगुन हाॅस्पिटल ला निघालो .मनांत विचारांनी थैमान घातले .नक्की काय प्रकार आहे ?का सुभाष च्या हाका आल्या .त्याचा आत्मा साडे तीन वाजता अनंतात विलीन झाला होता त्याच वेळी त्याच्या हाका ऐकु का आल्या .भास म्हणावा तर आम्ही दोघांनीही आवाज स्पष्ट ऐकला होता .आपण अंधश्रद्धाळू तर नाहिना होत असे मनात द्वंद्व चालु होते .सारे सोपस्कार उरकुन तीन वाजता घरी आलो .वडील तसे धार्मिक व वारकरी पंथातील होते .त्यांचा ठाम विश्वास होता सुभाष चा आत्मा त्यांना भेटून गेला .मला मात्र हे कोडे अध्याप ही उलगडले नाही .
भास्कर पवार पुणे .

No comments:
Post a Comment