भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Saturday, February 14, 2026

🇮🇳 तेथे कर माझे जुळती 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

🙏🙏🙏🇮🇳तेथे कर माझे जुळती 🇮🇳🙏🙏🙏
💥💥हुतात्मा आत्मे 💥💥
काल रात्री माझ्या स्वप्नांत चाळीस आत्मे आले.
चेहर्‍यावर निनांत शांती,कृतकृत्य झाल्याचे समाधान.,
देशासाठी बलिदान दिल्याची भावना,
सार्‍या भारतीयांनी दाखविलेले प्रेम, जवान अमररहे च्या घोषणा,
या मुळे भारावून गेलेले जवान, सद्गगतीत झालेले दिसले.
एक आत्मा हळुच वदला "आमचे बलिदान व्यर्थ तर जानार नाही ना? '
" नाही नाही असे नाही होणार "माझ्या तोंडून आपोआप शब्द गेले'.
'पण असे का वाटले आपल्याला '" तसे नाही पण पण परवांच,
राजकारण सुरू झाले होते आमच्या हौतात्म्यावर "एक आत्मा
चाचरत बोलला '" एक धिट जवान म्हणाला' आमच्या मरणाचे हे
राजकारणी लोक भांडवल करून आपली पोळी भाजून घेणार "
एक जवान पुढे येत भडभडून बोलला "कालच सरणाला अग्नी ही
दिला नाही तोवर टिव्ही चॅनलवर जाहिर चर्चा ऐकली, कांही बुध्दीवंत,
काही विषयतज्ञ, झालेल्या दुर्घटनेची अक्षरशः चिरफाड करीत होते.
हिरारीने आपली बाजू मांडत होते. दोष कुणाचा याबाबत चढाओढ
चालली होती. पुढे काय करायचे व काय करावे याबाबत, 
जाहीर चर्चा चालू होती.गोपनियतेचे भान कुणाला ही नव्हते.
माझेच खरे आहे हे पटविण्यासाठी अट्टाहास चालु होता ".
एक जवान म्हणाला" इकडे आमच्या प्रत्येकाच्या घरी मात्र मातंग
माजले होते "आई वडील, बायका मुलं, मित्रांचा आक्रोश बघवत
नव्हता, कसं सांत्वन करणार त्यांच." एक आत्मा थरथरत्या आवाजात
वदले "एकानेतर आमच्या बलिदानाचा सौदा ही करुन टाकला
" त्यांची पार्टी निवडुन आली तर एक एक कोटी रुपये देणार आमच्या
वारसांना, जाहीरपणे सांगितले त्याने. "कांही पेपर वाले तर पहिल्या दिवशी
झोपले होते , पहिल्या पानावर पानभर पेड जाहिराती छापुन,
आपले उत्पन्न पक्के करुन घेतले त्यांनी. कांही चॅनल वर
 तीच तीच दृष्य दाखवुन,कुणालातरी कोपरखळ्या मारीत,"
 ब्रेकिंग न्युजच्या "नावा खाली व" एक्झिक्युली "नांव देत टीआरपी
 वाढविणे चालले होते. "बंद चे तर विचारु च नका एक आत्मा
बोलला जागोजागी बंद केले गेले," उत्स्फूर्त बंद"च्या नावाखाली
 धिंगाना घातला गेलारेल्वे आडवल्या, गाड्या जाळल्या,
दुकाने बंद करुन सामान्य माणसाला
उपाशी ठेवले त्याला वेठीस ठेवले "हे सारे
 आमच्या नावाखाली केले गेले याचे दुखः आहे.
 आम्ही एका क्षणाचा तरी बंद पाळलाआहे का कधी?" 
"आम्हाला नक्की वाटते" एक अनुभवी दिसणारा आत्मा म्हणाला
 'आमच्या ह्या सामुदायिक हत्येचा नक्की च कांही अती महत्वाकांक्षी
 राजकीय नेते उपयोग करुन घेणार, सत्ता मिळविण्यासाठी
 ते आमच्या टाळुवरचे लोणी खाण्यास कमी करणार नाहीत. ".
... हे ऐकून सारेच आत्मे स्तब्ध झाले..... एक "अनुभवी शहिद जवान पुढे
येउन म्हणाला "कांही झालें तरी भारतीय सामान्य जनता जवानांच्या या त्यागाला
कदापी विसरणार नाही, ती आपल्या लेकरांबाळांची काळजी घेईल, लोकशाही
अबाधित राहील" या त्यांच्या बोलण्याने सार्‍यांनाच मोठा धिर आला.
.." लोकशाही चा विजय असो गर्जना 'देत स्वर्गाच्या उघडलेल्या कवाडातुन
 एक एक आत्मा आत प्रवेश करीत होता....⭐⭐⭐⭐⭐⭐
.भास्कर ©.(एक वर्ष पूर्ण झाले आहे त्या चाळीस हुतात्म्यांचें स्वर्ग रोहण होउन. त्या वेळची एक पोस्ट पुन्हा पोस्ट करीत आहे.)

No comments: