भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Friday, March 27, 2026

चिमनी


एक होती चिमनी
एक होता कावळा 
चिमनीचं घर होतं 
मानसाच्या घरांत 
अन मुलांच्या मनात 
कावळ्याचे घर होते 
झाडावर उंच फांदीवर 
मोठे वादळ आले 
कावळ्याचे घर वरुन
निखळुन खाली पडले 
कावळा चिवु कडे आला 
पण मानसाने त्याला 
हुसकावून लावले 
व काठी ने चिमनीचं 
घर पाडुन फेकुन दिले 
चिऊ उडुन गेली 
पुनः परत न येण्यासाठी. 
मुलं मात्र चिऊ ताई 
चिऊताई परत ये 
अजुनही म्हणत आहेत. 

No comments: