भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Sunday, December 15, 2024

"एक सुंदर अनुभुती "


मी एक अतिशय सुंदर अनुभुती सांगणार आहे. मी अंधश्रद्धावान नाही. मला श्र्वधेवर विश्रास आहे. दिनांक १६ एप्रिल २०२१ पासुन मला खोकला, सर्दी, कफ, दम लागणे प्रकार सुरू झाला. मुलीने, नातवाने त्वरीत तज्ञ डॉक्टर ची आॅन लाईन ट्रिटमेंट सुरू केली. दुसऱ्या दिवशी एम आर ए स्कॅन केले व लंग्ज ला व्हायरल असल्याचे दिसून आले.केस पाॅझिटिव्ह होती म्हणून त्वरित हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्याचा प्रयत्न जावई व नातु यांनी सुरू केले. तो पर्यंत oxi level ८८....९० पर्यंत खाली आलेली होती. नशीबाने भारती हाॅस्पिटल बिबवेवाडी येथे दोन तीन तासात बेड मीळाला. तातडीची मेडिकल ट्रिटमेंट सुरू झाली. कृत्रिम प्राणवायू त्वरीत लावला.
इंजेक्शन, गोळ्या, औषधे सुरु होती. किती काळ झोप, किती काळ स्वप्न पडत होती कळतच नव्हते. रात्रभर... पेशंट मामा... मावशी... सिस्टर.... ओरडत होते..... हा सगळा स्टाफ अखंड धावा धाव करीत होता... जाणवत होते. काय जेवतो आहे... काय खातो आहेकळत नव्हते. नातु व जावई भेटु शकत नव्हते.
शेवटी रात्री केंव्हा तरी स्टाफ ने माझा मोबाईल फोन आणुन दिला. नातवासी व जावयांसी बोललो. ते किती तांस ताटकळत होते कोण जाणे.
काय दिनचर्या चालु होती कळत नव्हते. 
एक मात्र करीत होतो. सौ ने लावलेली युट्युब वर रामरक्षा पठण, मारोतीस्तोत्र, व
श्री स्वामी समर्थांचे निश्चित होई रे मना हे सकाळ व संध्याकाळ लावायचो. वार्डांत दहा बेड होते... सर्व शांत पणे ऐकत असल्याचे जाणवत होते. स्टाॅफ पण ऐकत असे. चार पांच दिवस असे निघुन गेले. प्रकृती त बरीच अपेक्षित प्रगती होत होती. गुरुवारी२२एप्रील सकाळी सकाळी सहा वाजता स्वामी गजानन महाराजांचे निषंक होई रे मना लावुन शांत पणे एक एक शब्द ऐकत एका प्रसन्न धुंदीत जागे झोपेत अवस्थेत होतो. कीती वेळ गेला कळलेच नाही. समोरच्या बेड वरील ४२/४४ वर्षे वयाच्या पेशंट अगदी हसतमुख चेहर्‍याने माझ्या कडे बघून बोलला.... "आज पंधरा दिवसांनी इतके बरे वाटते आहे या मंत्राचा फार छान प्रभाव पडला... फार छान वाटलं. ते उठुन दांत घासायला प्रथमच स्वतः चालत गेले.
त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारे तेज एक अनुभुती देउन गेले. समोर चे तिन चार पेशंट सुध्दा फारच प्रसन्न दिसत होते. नाष्ट्याला शाबुदाणा खिचडी आली. समोर चा पेशंट बोलला "महाराजांचा प्रसाद मिळाला.....
डाॅक्टर आले... तपासणी झाली... त्या दिवशी तीन/ चार पेशंट ला डिस्चार्ज मीळाला त्यात मी पण होतो.तेथे परिश्रम करुन न चिडता काम करणाऱ्या स्टॉफ ला अनंत अनंत प्रणाम. 
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भास्कर पवार पुणे. 
🙏 🙏 🙏 🙏 🙏 

No comments: