भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Sunday, December 15, 2024

पर्णहिन वृक्षनो






पर्णहिन वृक्षनो
पर्णहिन वृक्षनो आठवते का ते गत वैभव 
वसंतातली हिरव्यागार ती पर्णाची मिठी
अन अलगद अंगी बिलगलेली वृक्षवल्ली 
छत्र पाना पानाचे डोईवरी तो-यात उभे !!
न्याहाळत होता निर्झरांतल्या स्वच्छ जलांत
स्व सौंदर्य ते तुझे तुच लगतच्या प्रवाहात 
सळसळत्या पाणांनी बहरले आणखीनच 
डौलदार रुपडे तुझे ,जणु भू मातेचे वस्त्र !!
विसावती तुझ्या तळी ग्रिष्माने तपलेले वाटसरु 
निवांत होऊन परतले सदनी विश्रांती घेऊनी 
तण तण वेचून घरटे बांधती खग तुझ्यावरती 
घास भरवती पिलांना तुझ्याच छत्र छायेखाली!!
ऋतुचक्र हे सदैव फिरते न कधी स्थिर तैसे 
पिकली पर्णे तुझीया पायी पाचोळा झाली 
पर्ण हिन करुन तुला सोडुन वार्‍या संगे गेली 
वाट पहा आता केंव्हा येईल वसंतोत्सव पुन्हा !!
भास्कर पवार  ०८ नोव्हेंबर २०२४🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

 

No comments: