भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Wednesday, December 25, 2024

सल


स ल 
रा प महामंडळाच्या नौकरीतुन २००२ मध्ये ३८ वर्षा च्या सेवे तुन सेवा निवृत्त झाल्या नंतर ,सोशल मीडिया वर फेसबुक व व्हाट्स अप वर सक्रिय होऊन ग्रुप वर वेगवेगळ्या मित्रांसमवेत विचार विनिमय ,साहित्य देवानघेवान ,माहीती अदानप्रदान ,यामुळे मित्रमंडळीचे ग्रुप निर्माण झाले .असाच एक ग्रुप सेवा निवृत्त राप आधिकार्यांचा होता त्याचे नांव " ASTRO "त्यात सामील झालो .या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे सर्व राप आधिकारी एकाच पातळीवर समान व या खात्याचा त्या खात्याचा असा भेदभाव न करता समान वागणूक देणे .दरवर्षी या ग्रुप चा मेळावा आयोजित करण्यात येत असे .दरवर्षी हा मेळावा म्हणजे मित्रांना भेटायची पर्वणीच .५/६मेळाव्यात मी हजर होतो .आनंद लुटला होता .या ग्रुप वर ३५०च्या वर मेंबर्स आहेत .मुख्य म्हणजे ज्या आधिकार्यांचे वाढ दिवस असतील त्यांना फोटो सह माहिती संचालक मंडळ रोज प्रशिध्द करीत व इतर सभासद त्यांना फोन ने मेसेज ने शुभेच्छा देत ,अगदी काल प्रर्यंत हे होत होते .मी ही संदेश पाठवुन व फोन करुन सर्वांना शुभेच्छा देत असे .काल ४/४/२०२४रोजी माझा वाढदिवस होता .मला वाटत होते आपल्या ग्रुप वरील माझ्या सहकारी आधिकारी यांचे कडुन शुभेच्छा मिळाव्यात .पण श्री नरेश गोळेजी यांचे शिवाय कुणी हि शुभेच्छा दिल्या नाहीत . ....
मी तरी का अशी अपेक्षा करावी .का मित्रांकडून अशी अपेक्षा ठेवावी .निवृत्तीनंतर वयाच्या 80 वर्षी का अशी आसक्ती असावी .मलाच हे प्रश्र पडले आहेत .हा सल कायम चा मनांत रहाणार आहे .नौकरीत असताना सिक्युरिटी असल्याने इतर आधिकारी दुर रहायचे ,वाळीत टाकले जायचो .पण आता ही तसेच .का अशी दुजाभावाची वागमवणुक मिळावी तेंव्हा ही आताही .का संचालक मंडळाने आज माझे नाव व फोटो टाकुन वाढ दिवस असल्याचे जाहीर करू नये .केवळ मी सिक्युरिटी चा होतो म्हणुन .आपल्या या समृद्ध ग्रुप कडुन मी ही अपेक्षा केली नव्हती .आता उद्या दिलगिरी व्यक्त होईल ही पण बुंदसेगयी ओ हौदसे नही आती ..
मानसाला ही एक भुक असते या जन्म दिवसाचे औचित्य साधून आपणांस शुभेच्छा मिळाव्यात .आनंद मिळावा ,आपल्या पेक्षा मोठ्यांचे आशिर्वाद मिळावेत .फार निराश होऊन हे लिहिले आहे .ठिक है भाई आपणे दिया हुआ दर्द भी हमै मजुर है ये आपणे दी हुई चीज है ..........भास्कर पवार पुणे 🌹 


No comments: