रात्री तिन च्या सुमारास जम्मूताई एक्सप्रेस, आडगांवी थांबली एका मिनिटा साठी. प्रथमेश आपली पाठिवरील सॉक, व हातातली बॅग सांभाळत त्या स्टेशन वर उतरला. एक कर्कश्य सिटी फुंकुन थांबलेल्या गाडीने वेग घेतला, तिनचार मिनिटांत स्टेशन सोडुन ती वेगात निघुन गेली व आंधारांत नाहीसी झाली. प्रथमेश ने आता त्या रिकाम्या फलाटावर नजर टाकली. सर्वत्र सातसुम, चिटपाखरू ही फलाटवर दिसले नाही. कुणीही तेथे उतरलेले दिसले नाही. स्टेशन वरील रेस्टरूम तर अंधारात बुडुन गेले होते. रात्री तेथे थांबण्याचा विचार आपोआपच विरुन गेला. आता तिन मैलावर असलेल्या घरी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रथमेश रेल्वे स्टेशन च्या बाहेर पडण्यासाठी पुला कडे गेला. पुलाच्या पायर्या चढतांना त्याला वाटु लागले की घरी फोन करून सांगावं आपण येत असल्याचे. पण पुन्हा वाटले नकोच आपण ठरविल्या प्रमाने सरप्राईज च देऊ या घरी. वाड्यातील आजी, आजोबा, बाबा, आई.,मोठे काका, मोठ्याई, नानाकाका, नवीकाकु, इंदु, शिंधु, बंड्या.,गोट्या, आत्याबाई, माध्या, सगळे कीती चकीत होतील आपल्या अचानक, न सांगता, येण्याने, एक रम्य छान चित्र प्रथमेश च्या नजरे समोर उभे राहिले. एम एस च्या शिक्षणासाठी तो मोठ्या शहरांत वर्षांपुर्वीच गेला होता. परीक्षा दोन महिन्यावर आली होती, म्हणून काॅलेज ला तशी सुटीच होती. होस्टेल च्या रुममेट नी आठ आठ दिवस घरी जाऊन येण्याचे ठरवले होते. प्रथमेश ने सरप्राईज ची कल्पना पुढे केली, पांचही मित्रांनी आनंदाने दुजोरा दिला होता. तसा प्रथमेश काल पहाटे गाडीत बसला व थोड्या वेळा पुर्वी स्टेशन ला उतरला होता. विचाराच्या तंद्रीत स्टेशन च्या मुख्यद्वारावर तो कधी येऊन पोहचला ते कळलेच नाही. बाहेर एकही रिक्षा, टॅक्सी, दिसली नाही. सर्वत्रच सामसुम दिसली. आता काय करायचं या विचारांत असतांनाच दुरवर रस्त्यावरुन दोन अंधुक दिवे स्टेशन कडे येतांना दिसले. हळु हळु स्टेशन च्या फाटकातुन काही तरी वाहान आंत येत आहे हे प्रथमेश ने बघीतले. एक टांगा जवळ जवळ येऊन पोर्च मध्ये उभा राहिला. प्रथमेश लगबगीने टांग्याकडे गेला. अरे हा तर गोपीचा टांगा, वा देवच पावला. "गोपीकाका तुम्ही इतक्या रात्री स्टेशन ला कसे? बाबांनी पाठवले कां? पण बाबांना तर माहीत नाही मी येणार आहे ते."
गोपी कांहीच न बोलता टांग्यातुन खाली उतरला,प्रथमेशने वाकुन त्यांना नमस्कार केला प्रथमेशची जडसीसाॅक, व बॅग उचलुन टांग्यात ठेवली, व नजरेनेच टांग्यात बसा असे खुणावत स्वतः टांगा हाकण्या साठी जाउन बसला. प्रथमेश पटकन टांग्यात मागे जाउन बसला. प्रथमेश ला फार फार बरे वाटले, घरी जायचा प्रश्र मिटला होता. "गोपीकाका मस्त ठेवला टांगा, अगदी अगदी नव्या सारखा, अन हा टोनी पण तसाच आहे ना, वा टोनी म्हणजे गोपुचा घोडा. पांढराशुभ्र, सुलक्षणी, गोपी त्याची बडदास्त पण मन लाऊन ठेवायचा. रोज चण्याचा तोबरा व हिरवा चारा त्याला चारायचा रोज खरारा करायचा. एकदाही चाबूक साधा उगारलाही नाही त्याच्यावर. "गोपीकाका तुम्ही कसे मला घ्यायला आलांत" प्रथमेश ने पुन्हा विचारलेच. ¡ 'शेजारच्या गावी गेलो होतो वेळ झाला परतण्याला.' गोपीकाका उत्तरले. गोपीकाका चार वर्षे प्रथमेश ला ह्याच टांग्यातुन शाळेत नेत व घरी आणत. प्रथमेशची व गोपीकाकांची गाढ मैत्री झाली होती. गोपीकाका प्रथमेश ला छोटेबाबूजी म्हणत, प्रथमेश ही त्यांना गोपीकाका म्हणत. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गोपीकाका घेण्यासाठी आले म्हंटल्यावर प्रथमेश निर्धास्तपणे, मजेत टांग्यात बसुन गोपीकाकांसी गप्पा मारत, आठवणीतले किस्से एकमेकांना सांगत घराकडे धावत होते. घरासमोर टांगा उभा राहिला. गोपीकाकांनी बॅगा वाड्याच्या दिंडीदरवाज्या जवळ आणुन ठेवल्या, व टोनी ला पाणी दाखविणे गरजेचे आहे, असे म्हणून प्रथमेशचा निरोप घेऊ लागले. प्रथमेशने बॅगेतून गोपीकाकां साठीच आणलेली शाल गोपीकाकांना आदराने पांघरली. डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रु घेउन ते टांगाघेउन गेले. टांगा दिसेनासा होईपर्यंत प्रथमेश बघतच होता. सकाळच पावणेचार वाजले होते. प्रथमेशने वाड्याच्या दरवाज्याची कडी वाजविली. माध्याने दार उघडले, पाठोपाठच आजोबा आले. अरे वा प्रथमेश आला ते सर्वांना ओरडुन सांगणार तोच प्रथमेशने त्यांना थांबविले. "आता मी झोपणार आहे, सर्व जागे झाले तर माझी झोप होणार नाही दोन दिवस जागरण झालंय, उध्या सकाळी भेटु सर्वांना, तुम्ही ही झोपा." आजोबा व माध्या झोपवायला नीघुन गेले. प्रथमेश ही आपल्या रुमवर झोपण्यासाठी गेला.
सकाळी आठ वाजतां सर्व कुटुंबीय रोजच्या प्रमाणे चहा साठी एकत्र जमुन जेवनाचे टेबलाभोवती बसुन गप्पा मारत होते, त्यांच्या आवाजाने प्रथमेश ला जाग आली, तो उठुन आवरुन सर्व कुटुंबीय जमले होते तेथे गेला. त्याला पाहुन सर्व च आश्चर्याने बघतच राहिले. "अरे तु कधी आलास? कळविले नाहीस, कसा आला. सर्व ठिक आहे ना. प्रश्रांचा नुसता भडीमार, सर्वांच्या प्रश्रांना प्रथमेश शांत पणे उत्तर देत होता. सर्वांना त्याचे हे सरप्राईज फारच आवडले. इंदु शिंधु बंड्या, गोट्या तर त्याला कधिच येऊन बिलगली होती. आजोबांनी गोड शि-या ची आर्डर दिली.सर्वांच्या गप्पा रंगल्या, प्रवास कसा झाला. कुणासाठी काय काय आणले. इ. इ. विषय झाले. बाबांनी विचारले रात्री कीती वाजतां आली गाडी? प्रथमेशने सांगितले "रात्री पावनेतिन तिन ला, नाना काकांनी विचारले, 'मग स्टेशन वरुन कसा काय आला वाड्यावर?'" टांग्याने" प्रथमेश उत्तरला, 'इतक्या रात्री टांगा मिळाला'? आत्याबाई ने विचारले," हो हो, गोपीकांकाचा टांगा स्टेशन मार्गे येत होता त्यांनी तर मला सोडले वाड्यावर "काय " सर्वांचे आवाज टिपेला पोहचलेले प्रथमच ऐकत होता प्रथमेश, सारेच आश्चर्याने व डोळे विस्फारून बघत होते प्रथमेश कडे. आजोबा प्रथम भानावर आले," प्रथमेशा तु गोपीकांका च्या टांग्यातुन स्टेशन ते वाडा आलास?" त्यांनी घोग-या आवाजांत विचारले.. हो ना आजोबा, आम्ही दोघांनी खुप छान गप्पा मारल्या. जुण्या आठवणी काढल्या, त्यांच्या साठी आणलेली शाल मी माझ्या हाताने त्यांना पांघरली. "अध्याप ही कुटुंबीयांचे चेहेरे पडलेले, विस्फारून गेलेले दिसत होते. "तुम्ही सर्व माझ्याकडे असे का बघता आहांत व असे प्रश्न कां विचारता आहात, काय झालं,?" प्रथमेशने वैतागून विचारले." प्रथमेश ऐक "नानाकाका गंभीर होत काप-या आवाजांत म्हणाले" गोपीकांका नो मोअर लाईव्ह हिअर, ते चार महीण्यापुर्वीच टांगा व ट्रक च्या आपघातांत गेले . टोनी सुध्दा गेला, टांगा पलटी झाला होता. टांगा पार मोडला. नशीब टांग्यात कोणी नव्हते. प्रथमेशला आपण काय ऐकतो आहे हे क्षणभर कळेच ना, हे कसं शक्य आहे, कालच तर रात्री गोपीकाकांच्या टांग्यातुन आलो मी वाड्यवर. तो मटकन खाली बसला. घरातील सारं वातावरण बदलुन गेलं. काहिसी भिती, दुखः, आश्चर्य सर्वत्र दाटले. कोणी कोणासी बोलेना. आजी भानावर आली तशी तीने मिठ मोह-या घेऊन प्रथमेशची दृष्ट काढली. बाबा, नानाकाका, आजोबा एकत्र येऊन या घटणे बदल गंभीर पणे चर्चा करू लागले. प्रथमेश थोडा भानावर आला. त्याचा भुताखेतांवर अजिबांत विश्र्वास नव्हता. पण रात्रीच्या घोषणेमुळे तो पार हदरुन गेला होता नक्की. "खरंच का गोपीकाकां टांगाघेउन आपल्या साठी आले होते स्टेशन ला.. पण ते तर या जगांत नाहीत. मग ते मला तर दिसले, टांगा, घोड्या सुध्दा हे कसे "प्रथमेश च्या डोक्यांत हे प्रश्र थैमान घालु लागले. प्रथमेशने मनासी कांहितरी निश्चित केले, आजोबा, नानाकाका, बाबा यांच्याशी बोलण केलं, गोपीकाकांच्या घरी जाऊन काकुला भेटायचेच, प्रथमेश चा ठाम निश्चय पाहुन सर्वानी प्रथमेशच म्हणणं कबुल केले. ते चौघे, माध्या व आत्याबाई सर्व मिळुन गोपीकाकांच्या घरी सर्व पोहचले. तसं गोपीकाकांच घर लहाणंसच होते, प्रथमेश कधी मधी त्यांच्या बरोबर तेथे जात असे. काकी त्याला दही पोहे खायला न्यायची तो आवडीने खायचा. काकीने प्रथमेश ला बघुन हंबरडा फोडला. "प्रथम तुझी फार फार आठवण काढली होती रे तुझ्या गोपीकाकां ने, फार इच्छा होती तुला भेटायची. प्रथमेश ला दहीपोहे दे म्हणाले जातांना" हुंदके देत काकी म्हणाल्या. स्वतः ला सावरत उठुन प्रथमेश साठी दही पोहे केले. प्रथमेश च्या घशाखाली घास उतरेणा, पण घरांत लावलेला गोपीकाकांचा फोटोबघुन व त्यांची शेवटची इच्छा ऐकुन प्रथमेशने दही पोहे संपविले. मंडळी काकीचा नारोप घेऊन निघाली, बाहेर टोनीच्या तबल दार उघडेच होते. सर्व मंडळी प्रथमेशच्या बरोबर आंत शिरली. आंत दोन्ही चाकं मोडुन पडलेला टांगा धुळ खात पडलेला होता. पुन्हा कधीही दुरुस्त न होण्यासाठी पडुन होता. एक नवीन कोरी करकरीत शाल गोपीकाकांच्या सिटवर पडलेली होती. मंडळींनी सुचक नजरेने प्रथमेश कडे पहात तबेला सोडून वाड्याची वाट धरली.
© भास्कर पवार.

No comments:
Post a Comment