भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Friday, March 27, 2026

दयाघना दयाघना

🙏 हे दयाघना 🙏
नको विस्कटू हा संसार जगाचा,
कुणा एकाच्या चुकांचा भार 
सर्वांवर का रे टाकावा?
निर्दोषांनाही शिक्षा देणे,
हा कोणता न्याय तुझा?,
हे देवा, करुणेचा झरा 
पुन्हा वाहू दे जगा।।
खरेच अज्ञानी आम्ही सारे.
लोभाच्या जाळ्यात अडकलो,
आमचे पोट भरले तरी, 
परक्याचे लुटत राहीलो, 
समोरचा उपाशी असताना, 
डोळे आमुचे आम्ही च 
जाणुनच बुजुनी मिटले,
हे देवा, विवेकाचा दीप 
पुन्हा अंतरी पेटू दे।।
हव्यास आमुचा अति झाला,
सीमा तुझ्याच भेदिल्या,
भूभागांचे तुकडे करून,
रेषा रक्ताने रंगवल्या;
माणुसकीच्या नात्यांवरती, 
 जखमा खोल उमटल्या,
हे देवा, त्या जखमांवर 
प्रेमाचा स्पर्श पडू दे।।
सूडाच्या ज्वाला भडकल्या, आकाशालाही भिडल्या,
स्पर्धेच्या आंधळेपणात, 
माया सारी कोरडी झाली, 
अंत समीप दिसू लागला,
 माज आम्हांसी चढला,
हे देवा, अहंकाराचा हा, 
अंधार दूर सारून टाक।।
मारणारा तूच, तारणहारही तूच दयाघना,धाव घेई रे आता, 
थोपव हा संहाराचा महायज्ञ;
जीवनदान दे पुन्हा या, 
व्याकुळलेल्या जगाला,
आळविती तुझी लेकरे—
 ऐक ना रे दयामय दाता।।
🙏 हे दयाघना, हे दयाघना 🙏
भास्कर पवार पुणे. 26  मार्च 2026.
(इराक इस्रायल अमेरीका युध्दाच्या पाश्र्वभूमीवर.) 

No comments: