भास्कर रंगनाथ पवार .🌹 BHASKAR RANGNATH PAWAR

Saturday, April 4, 2026

लग्न भटजी व फोटो

मंडपात लागली मंगल वेला,
हास्य, गोंधळ, आनंद खेळा।
भटजी म्हणती “मंत्र सांभाळा”,
फोटोग्राफर म्हणे “जरा इकडे वळा”!
हातात हार, नजरेत प्रश्न,
कुणाचं ऐकू हा मोठा गोंधळ खास।
सप्तपदीची चाल सुरु झाली,
पण पोझ देताना पावलं थबकली।
हवनाच्या ज्वाळा साक्ष देत,
क्षण सुंदर मनात कोरत जात;
पण “स्माईल करा!” असा आवाज,
क्षणभर मोडतो विधीचा साज।
वऱ्हाडी मंडळी जेवणात रंगली,
गप्पांची मैफल छानच रंगली;
आणि इकडे नवरा-नवरी बेचैन,
“भटजी की कॅमेरा?” दोघेही मेन!
असं हे लग्न – हसू आणि थोडा गोंधळ,
परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ।
शेवटी  राहते गोड,
क्षण हेच आयुष्याचे खरे मोड।

चित्र एआय करामत

No comments: